विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात बुधवारीही सचिन वाझेची देशमुख यांच्या वकिलाकड़ून उलट तपासणी झाली. देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो याबाबत आठवत नसल्याचे वाझेने सांगितले.Sachin Waze says he doesn’t remember when he met Anil Deshmukh
बुधवारी दुपारच्या सुमारास वाझे यांच्या उलट तपासणीला सुरुवात होण्यापूर्वीच देशमुख यांच्या वकिलाने मध्यस्थी करत वाझे आणि परमबीर सिंह यांच्या भेटीबाबत माध्यमांमध्ये रंगलेल्या चर्चेविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी देशमुख स्वत: आयोगात हजर होते. यावेळी स्वत: सचिन वाझेने देशमुख यांच्या वकिलांच्या नाराजीला उत्तर देच प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.
जे घडले ते त्यांनी लिहिल्याचे सांगितले. न्यायालयीन चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करत ही खुली चौकशी आहे, यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडले तेच सांगितले गेल्याचा युक्तिवाद करताच देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि पुन्हा वाझेच्या उलट तपासणीला सुरुवात झाली.
देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी अनिल देशमुखांसोबत कधी भेट झाली असे वाझे यांना विचारताच, कार्यालयीन आदेश प्राप्त झाला तेव्हा भेटलो. बिगर कार्यालयीन कामासाठी त्यांनी मला कधी बोलावले होते का, हे मला आठवत नाही, असे वाझेने आयोगाला सांगितले.
तसेच यावेळी कुंदन शिंदे यांना ओळखता का, असे विचारताच, ह्यत्यांना मी वैयक्तिक ओळखत नसून, ते देशमुख यांचे खासगी सचिव होते हे मला माहिती होते. तसेच त्यांच्याशी कधी बोलणे झाले हे देखील आठवत नाहीह्ण, असे वाझेने नमूद केले.
कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी तसेच वकिलांशी चर्चा करण्यासाठी देशमुख हे ९ डिसेंबरला पुन्हा आयोगाच्या कार्यालयात येणार आहेत. न्या. कैलास चांदीवाल यांनी त्यासाठी परवानगी दिली. तसेच त्याच्या एक दिवस आधी ८ डिसेंबरला आयोगात येण्याची परवानगी सचिन वाझेला देण्यात आली. देशमुख व वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App