विशेष प्रतिनिधी
मुंबई : माहिती अधिकाराच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. दहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. रमेश शहा असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव असून ही रक्कम घेताना शहा याला पकडण्यात आले.RTI activist arrested for demanding Rs 10 lakh ransom from builder
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कंत्राटदाराला अंधेरी येथील कार्यालयाच्या भिंती, वनराई पोलीस वसाहत आणि तीन डोंगरी पोलीस वसाहतीचे नूतनीकरण हे काम देण्यात आले होते. हे काम सुरू करताच रमेश शहा हे त्या ठिकाणी गेला.
बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत शहा याने काम थांबविण्यास सांगितले. हे कंत्राट कसे देण्यात आले, बांधकामात कोणते साहित्य वापरण्यात आले? याची माहिती मिळविण्यासाठी शहा याने शासकीय कार्यालयात माहितीचा अर्ज केला. हा अर्ज मागे घेण्यासाठी शहा याने कंत्राटदाराकडे दहा लाखांची मागणी केली.
दहा लाख रूपये द्यायचे नसल्याने या कंत्राटदाराने पोलिसांत तक्रार केली. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला व दहा लाखाची रक्कम स्वीकारताना शहा याला रंगेहाथ अटक केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App