जावयाच्या चार महिन्यांपूर्वी सुरू कंपनीला हसन मुश्रीफ यांनी दिले कंत्राट, किरीट सोमय्या यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयाची असलेल्या जयोस्तुते प्रा. लिमिटेड या कंपनीला भ्रष्ट पद्धतीने ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न फाईल करण्याचं कंत्राट दिलं. या कंपनीला सुरू होऊन चार महिनेही झाले नव्हते तरीही हसन मुश्रीफ यांनी पदाचा गैरवापर करून हे कंत्राट दिलं होतं असा आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला.Hasan Mushrif gave contract to son in law’s company which started before four months , Kirit Somaiya alleges

सोमय्या म्हणाले, मी याविरोधात कोल्हापूरला आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला कोल्हापूरला जाण्यापासून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी रोखलं होतं. मात्र आता ते भ्रष्ट कंत्राट ठाकरे सरकारने रद्द केलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या जावयाला 10 मार्च 2021 ला हे कंत्राट देण्यात आलं होतं.



महाराष्ट्रातल्या 27 हजार ग्रामपंचायतींचं कंत्राट या कंपनीला देण्यात आलं होतं. एका ग्रामपंचायतीकडून वर्षाला 50 हजार रूपये जयोस्तुते लिमिटेडला पुढील दहा वर्षांसाठी द्यायचे असं या कंत्राटात होतं. म्हणजेच 15 हजार कोटींचा हा घोटाळा आहे हे उघड आहे.

उद्धव ठाकरे सरकारने जयोस्तुतेला हे कंत्राट देऊन महाराष्ट्रातल्या नऊ कोटी ग्रामीण जनतेवर अन्याय केला होता असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2021 ला सरकारने एक जीआर काढला. जयोस्तुते प्रा. लिमिटेडसोबत महाराष्ट्र शासनाने केलेला करारनामा रद्द करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ असो किंवा उद्धव ठाकरे कोव्हिडच्या काळातही किती मोठा भ्रष्टाचार केला होता हे आपल्याला यावरून लक्षात येतं असे सांगून किरीट सोमय्या म्हणाले, 30 मार्च 2021 ला करार झाला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये होता.

त्या लॉकडाऊनमध्ये मिया मुश्रीफ काय काम करत होते? तर कोव्हिडच्या नावाने महाराष्ट्राच्या जनतेला लुटत होते असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला. या कंत्राटाची प्रक्रिया 5 मे 2020 ला सुरू झाली होती. त्यावेळीही महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये होता. उद्धव ठाकरे घराबाहेर नाही तर खोलीच्या बाहेरही पडत नव्हते. त्यावेळी शरद पवारांचे पट्टशिष्य असलेल्या हसन मुश्रीफ यांनी 15 हजार कोटी लुटण्याचा डाव आखला.

Hasan Mushrif gave contract to son in law’s company which started before four months , Kirit Somaiya alleges

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात