Rohit Pawar : जामखेड मधून रोहित पवारांना हाकलण्याच्या बेतात काँग्रेस; पण रोहित पवार खापर फोडताहेत भाजप आणि अजितदादांवर!!

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) कर्जत जामखेड मतदार संघातून हाकलून देण्याच्या बेतात आहे काँग्रेस; परंतु रोहित पवार मात्र खापर फोडत आहेत भाजप आणि अजितदादांवर!! रोहित पवारांच्या एका सोशल मीडिया पोस्ट मधूनच ही बाब उघड झाली. Rohit Pawar out from Jamkhed planned congress

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपली पत्नी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात उभे केले. तिथे सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. परंतु पराभव झाल्याबरोबर लगेच अजितदादांनी त्यांची राजकीय सोय राज्यसभेत लावून दिली. त्यामुळे लोकसभेतल्या पराभवातून अजितदादा किंवा सुनेत्रा पवारांचे फारसे कुठलेही नुकसान झाले नाही. परंतु काल अचानक अजितदादांना घरातच राजकारण केले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभे केले ही आपली चूक झाली, अशी उपरती झाली. त्यांनी ती एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून दाखविली. आता याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपला कर्जत जामखेड मतदार संघ “सेफ” करून घेण्याचा प्रयत्न चालविला.

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार “असुरक्षित” झाले आहेत. कारण काँग्रेसचे नेत्यांनी त्यांना कर्जत जामखेड मधून हाकलून देऊन बारामतीत आश्रय घ्यायला सांगितला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात किमान चार वेळा काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे त्या मतदारसंघावर काँग्रेसचाच अधिकार आहे, असा ठाम दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यामुळे रोहित पवार अस्वस्थ झाले होते. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेसबरोबरच असल्याने त्यांनी त्यावर कुठलीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.


अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या- कर शून्य असावा, पण अनेक आव्हाने आहेत, संशोधनासाठीही निधी लागतोच


परंतु आता बारामतीतल्या लढतीत बहीण विरुद्ध पत्नी असा सामना घरातच रंगवल्याचा पश्चाताप अजितदादांना झाल्याचे पाहून रोहित पवारांनी कर्जत जामखेडच्या बाबतीत वड्याचे तेल वांग्यावर काढले. त्यांनी अजित पवारांनाच तुमच्यावर कर्जत जामखेड संदर्भात भाजपचा दबाव आहे का??, असा सवाल केला. प्रत्यक्षात रोहित पवारांना कर्जत जामखेड मधून हा कळण्याच्या बेतात काँग्रेस आहे. परंतु, त्यांनी त्याचे खापर मात्र भाजप आणि अजितदादांवर फोडायचा प्रयत्न चालविला आहे. हेच रोहित पवारांच्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्ट झाले.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

आदरणीय दादा, 

खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे.

अजित पवारांची स्फोटक कबुली

राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती.

Rohit Pawar out from Jamkhed planned congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात