‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रम नोंदविला जावा यासाठी आणखी तयारी करून उत्तम कामगिरी करणार आहे.Record of seven year old girl in Akola, 51 eco-friendly Ganesh idols made in five hours
विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्ह्यातील कौलखेड येथील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या सात वर्षांच्या पूर्वा प्रमोद बगळेकर हिने विक्रम केला.दरम्यान पूर्वाने पाच तासांत ५१ पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या. या विक्रमाची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली.
पूर्वाच्या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने १७ जानेवारी रोजी केली.या संदर्भात ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने इ-मेल करून पूर्वाच्या घरच्यांना कळविले.’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने विक्रमाची नोंद केल्यामुळे पूर्वाचे कौतुक होत आहे.
पूर्वाचे वडील शिल्पकार आणि आई ममता चित्रकार आहे. आईवडिलांकडूनच पूर्वामध्ये कलागुण आल्याचे तिवा ओळखणाऱ्यांनी सांगितले.पूर्वाने आणखी तयारी करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा विश्वविक्रम करावा, अशी इच्छा सगळ्यांची इच्छा आहे.आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रम नोंदविला जावा यासाठी आणखी तयारी करून उत्तम कामगिरी करणार असल्याचे पूर्वाने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App