Ram Satpute माळशिरस विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. भाजपचे विधानपरिषदेतील आमदाररणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपा विरोधात काम केल. माझ्या पराभवासाठी पैसे वाटले. धमक्या दिल्या. पक्षविरोधी काम करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपामधून हकालपट्टी करावी अशी मागणी सातपुते यांनी केली आहे.Ram Satpute
राम सातपुते यांनी एक ट्विट करत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. राम सातपुते यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, ‘माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केलं.
पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या.’, असे म्हणत असताना राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जे पी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट केली आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील हे कागदोपत्री भाजपचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी पक्षविरोधी केलेले काम राज्य आणि देशाच्या नेत्यांनी पाहिल्याचे सातपुते यांनी म्हटले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याचे परिणाम गंभीरपणे भोगावे लागतील असा थेट त्यांनी मोहिते पाटलांसह विद्यमान आमदार उत्तम जानकर यांना दिला. राम सातपुते यांनी मोहिते पाटील कुटुंबावरही सडकून टीका केली. ज्यांना सगळे दिले त्यांनी भाजपाला दगा दिला असे सांगत पक्ष याची नक्की दखल घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App