मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. प्रचंड ऊर्जा – उत्साह आणि नंतर अवसानघात याचे चक्र पुन्हा एकदा फिरले आहे!! Raj Thackeray’s visit to Ayodhya has been postponed
राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करून अयोध्या दौरा स्थगित. उद्या बोलू, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या अयोध्या दौरा विषयीच्या सर्व बातम्यांना जणू स्थगिती मिळाली आहे. राज ठाकरे परवाच्या पुण्याच्या सभेत दौरा स्थगित का केला??, याचा खुलासा करणार आहेत.
– चक्र पुन्हा घसरले
पण मूळात वर उल्लेख केल्याप्रमाणे राज ठाकरे म्हणजे प्रचंड ऊर्जा – उत्साह आणि नंतर अवसानघात हे चक्र मात्र पुन्हा फिरले असेच दिसून येत आहे. राज ठाकरे म्हटले की डोळ्यासमोर कायम प्रचंड उत्साही, ऊर्जावान व्यक्तिमत्व समोर येते. त्यांच्या सभा, त्यांची वक्तव्ये त्यानिमित्ताने महाराष्ट्रात होणारी खळबळ हे सगळे घडते… पण या सगळ्यात शेवटी काही ना काही तरी घटना किंवा कारण घडते आणि अवसानघात होतो!! आयोध्या दौरा रद्द होण्यात नेमके असेच घडले आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1 — Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
असातत्याचा चक्रव्यूह कधी भेदणार??
राज ठाकरे यांच्या राजकारणात उतरण्याला 30 पेक्षा अधिक वर्षे होऊन गेली आहेत. त्यांच्या सभेत गर्दी कधी अटली नाही आणि त्यांना मते कधी मिळाली नाहीत!! गर्दी आणि मतांच्या व्यस्त प्रमाणाचा चक्रव्यूह भेदणे राज ठाकरेंना कधी जमलेच नाही!! याची कारणे तशी बाह्य राजकारणात आहेत, तशीच ती किंबहुना त्यापेक्षा अधिक कारणे खुद्द राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात नसून राजकीय कृती आहेत!! राज ठाकरे भूमिका बदलत राहिल्याने त्यांना अपयश येते अशी जी कारणमीमांसा राजकीय विश्लेषण करतात, ती अर्धवट आहे. भूमिका बदलणारे, पलटी मारणारे अनेक नेते आपापल्या पातळीवर यशस्वी आहेत. मग भले त्यांना राष्ट्रीय पातळीवर अपयश आले असेल, पण भूमिका बदलापेक्षा “असातत्य” हा सर्वात मोठा दुर्गुण राज ठाकरे यांना चिकटला आहे!!
ब्रजभूषण सिंह यांचा अडथळा कितपत खरा?
राज ठाकरे यांची सभा होणार, होत आहे आणि झाली आहे. या सर्वांमधून मनसैनिकांमध्ये किती उत्साह पसरतो… सभा होणार म्हणून जोरदार तयारी… सभेत प्रचंड जल्लोष आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर काम करण्यासाठी मिळालेली ऊर्जा… हा घटनाक्रम असतो. मनसैनिक खरंच कामाला लागतो आणि नंतर अशा काही घटना – घडामोडी घडतात हे मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडते आणि मनसैनिक आपापल्या वैयक्तिक उद्योगाला लागतात!! राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा देखील तेवढाच उत्साह होता. 10 रेल्वे गाड्या बुक केल्या होत्या. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, पुणे अगदी नागपूर पर्यंत मनसैनिकांनी राज ठाकरें बरोबर अयोध्येत जाण्याची तयारी केली होती. भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आता ब्रजभूषण सिन्हा यांनी किती ताकद लावून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात घोडा घातला असता, हा भाग अलहिदा.
पायाच्या दुखण्याचे कारण
पण राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामागची कारणे स्वतः राज ठाकरे पुण्याच्या 22 तारखेच्या सभेत सांगणार आहेत. सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या पायाचे दुखणे परत उद्भवल्याने यांच्यावर शस्त्रक्रिया करायला लागू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे अयोध्या दौरा स्थगित करावा लागल्याचे सांगितले जात आहे. कारण काहीही असो, अगदी रास्त देखील असो. या कारणाचा खरेपणा नाकारण्याचा प्रश्न नाही, पण या सगळ्यामुळे मनसैनिकांचा मात्र अवसानघात झाला ही वस्तुस्थिती आहे.
सातत्याचा अभाव कधी संपणार??
मनसेला खरंच आता राजकीयदृष्ट्या गमावण्यासारखे काही उरलेले नाही त्यामुळे राज ठाकरे यांच्या केवळ 3 सभांनी महाराष्ट्रात मनसैनिकांमध्ये जे चैतन्य निर्माण केले होते जो उत्साह पसरला होता त्यावर मात्र विरजण पसरले आहे. राज ठाकरे आधी स्वतःच्या वक्तव्यांनी जोरदार भाषणे मनसैनिकांनी प्रचंड ऊर्जा देतात उत्साह देतात व नंतर स्वतःच्या कृतीने असे मनू सैनिकांच्या उर्जेवर उत्साहावर विरजण का घालतात??, हा खरा प्रश्न हे कोणत्याही राजकीय पक्षाला सातत्याने यश मिळवण्यासाठी सतत काम करावे लागते. नेता ऊर्जावान असावा लागतो. पण त्याही पलिकडे जाऊन तो सतत आपल्यासाठी काम करतो आहे ही भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सतत ठेवावी लागते नेमकी नेमक्या याच भावनेचा जसा काँग्रेसमध्ये अभाव आहे, तसाच मनसेमध्ये देखील अभाव आहे.
सापडला तरी उपाय कोण करणार??
भाजप आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते आणि नेते सतत काहीना काहीतरी काम करत राहतात आणि त्या कामाचे फळ त्यांना त्याच्या स्वरूपात मिळत राहते. ही वस्तुस्थिती आहे. तसे मनसैनिकांच्या बाबतीत का घडत नाही याचे रहस्य राज ठाकरे यांच्या “असातत्यात” लपले आहे, ही नाइलाजास्तव मांडावी लागणारी वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांना हे समजत नसेल असे नाही. पण समजले तरी उपाय सापडत नाही आणि उपाय सापडला तरी तो करता येत नाही हे मनसैनिकांचे दुर्दैव आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App