प्रतिनिधी
मुंबई : देशाच्या विकासात वाढती लोकसंख्या अडथळा ठरतेय. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रसंगी सक्ती करण्याची गरज आहे, असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नोंदविले आहे. देशाच्या लोकसंख्येचा आपण नीट विचार करत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत आणि सांगूनही लोकसंख्या कमी होत नसेल तर सक्ती केली पाहिजे. यासाठी जनतेला प्रोत्साहन द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले. Raj Thackeray pitched for population control
एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रातील काही नेत्यांशी याविषयी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोक या विषयावर उघड बोलायला का घाबरतात? अशी विचारणा करून त्यावर विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, की देशातील जनतेला कमी मुले झाल्यास फायदे देणार आहात असे सांगत प्रोत्साहन पण द्यावे लागेल. आपण हिंदू, मुस्लिम असे पाहू नये असे आवाहन त्यांनी केले. “दारू पिऊन गाडी चालवल्यावर सक्ती करता. जेलमध्ये टाकता किंवा दंड घेता. यामुळे दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली. चांगल्या गोष्टींसाठी सक्ती करावी लागते. लोकशाही काही गोष्टींसाठी मारक ठरत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. काही विषयांमध्ये केली नाही तर हे प्रश्न कधीच सुटणार नाही,” असंही राज ठाकरे म्हणाले.
“जोपर्यंत आपण देशाच्या लोकसंख्येवर विचार करत नाही तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाही. रहदारी सुरळीत व्हावी म्हणून पूल बांधतो आणि परत तिथे लोकसंख्या वाढून शहर उभं राहतं. मग परत रस्ते, पूल बांधतो, परत लोक येतात. हे सर्व न संपणारं आहे. शहरांच्या विकासाचा प्लॅन होतो पण टाऊन प्लॅनिग होत नाही, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही
“प्रगती आपण नक्की केली आहे. पण याचा अर्थ रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही. देश म्हणून विचार करताना काही वैचारिक प्रगती झाली का? देश म्हणून आपण विचार करतो का?चीनसोबत तुलना करण्यात अर्थ नाही. आपल्या देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत?,” असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. “आजही निवडणुकांमध्ये विषय बदललेले नाहीत. आजही चांगले रस्ते, पाणी, वीज, शिक्षण देऊ असं सांगितलं जातं. पण मग आपण नक्की प्रगती कुठून गेली?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
“नुकताच पूर येऊन गेला. मग आपण देशात धरणे खूप बांधली. पण धरणे बांधल्यानंतर त्यातून होणारा ओव्हरफ्लो यामुळे आमची शहरं का बर्बाद होत आहेत? त्याची काही सिस्टीम लावलेली नाही. हे ७५ वर्षात होत नसेल तर मग प्रगती झाली की नाही असा प्रश्न आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App