विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा अक्कलदाढ, भाजपची बी टीम, अशा शब्दांचा भडीमार करत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षामधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. Raj Thackeray: NCP’s response to Raj Thackeray from BJP with a barrage of words like ‘Bhonga’, ‘Lecture’, ‘Sarda’, ‘Akkaldadh’ !!
शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची अक्कल काढली आहे. त्यांना भाजपचा भोंगा म्हणले आहे. भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर ते गुढीपाडवा मेळाव्यात बोलले. त्यात नवीन काहीच नव्हते. तेच शरद पवारांच्या चरणी अनेकदा गेले. त्यांना अक्कलदाढ उशिरा आली, अशा शब्दांचा भडिमार संजय राऊत यांनी केला, तर शरद पवार यांनी राज ठाकरे हे तीन-चार महिने भूमिगत होतात आणि नंतर अचानक येऊन लेक्चर देतात, असे शरसंधान साधले.
राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवाद पसरवत नाही असा दावा करताना शरद पवार यांनी छगन भुजबळ अरुण गुजराथी मधुकर पिसाळ यांना विधिमंडळात नेतृत्वाची संधी दिल्याचे सांगितले. अजित पवारांना विधिमंडळात काम करताना 30 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री केले, असे ते म्हणाले.
पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जन्माला आल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवादाचे विष पेरले या मूळ प्रश्नाचे उत्तर शरद पवारांनी दिले नाही. त्याचप्रमाणे यशवंत जाधव, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, ठाकरे कुटुंबीयांवरील छापे या मुद्द्यांवर संजय राऊत यांनी उत्तरे दिली नाहीत.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना सरडा म्हणून घेतले. सरडा सुद्धा एवढे रंग बदलत नाही तेवढे राज ठाकरे रंग बदलत आहेत. अधिक मोदींची स्तुती केली. नंतर मोदींची निंदा केली आणि आता परत मोदींची स्तुती करत आहेत. सरडा सुद्धा एवढे कमी वेळात रंग बदलत नाही, असे टीकास्त्र जितेंद्र आव्हाड यांनी सोडले,
तर राज ठाकरे हे भाजपची बी टीम आहेत. तशा भाजपने अनेक बी टीम गोळा केल्या आहेत. एमआयएम बी टीम आहेत. त्यात राज ठाकरे यांच्या बी टीमची भर पडली आहे, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोडले आहे.
शरद पवार यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांचे बोटाच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सदस्य निवडून येतात, असे म्हटले आहे पण राज ठाकरे यांच्यावर भाषण टीका करायला मात्र हाताच्या बोटाच्या पलिकडे जाणाऱ्या संख्येत नेते पुढे आलेले दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App