देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज सकाळपासून काही भागांत पाऊस सुरू आहे. पावसामुळे नजीकच्या काळात थंडी वाढू शकते. बेमोसमी पावसाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. जून-जुलैपासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबरपर्यंत संपतो. मात्र, आता डिसेंबर उजाडला तरीही मुंबईतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.Rain Updates WATCH Light rain this morning in some areas of Mumbai See Forecaste Of Maharashtra
वृत्तसंस्था
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज सकाळपासून काही भागांत पाऊस सुरू आहे. पावसामुळे नजीकच्या काळात थंडी वाढू शकते. बेमोसमी पावसाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. जून-जुलैपासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबरपर्यंत संपतो. मात्र, आता डिसेंबर उजाडला तरीही मुंबईतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
#WATCH मुंबई के कुछ इलाकों में आज सुबह हल्की बारिश हुई। pic.twitter.com/njYLf5OIj9 — ANI_HindiNews (@AHindinews) December 1, 2021
#WATCH मुंबई के कुछ इलाकों में आज सुबह हल्की बारिश हुई। pic.twitter.com/njYLf5OIj9
— ANI_HindiNews (@AHindinews) December 1, 2021
वांद्रे, शिवडी, वडाळा, परळ, वाशी, सानपाडा यासह मुंबईतील अनेक भागांत सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत असल्याची माहिती आहे. याआधी मंगळवारी मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
त्याचवेळी, IMD ने बुधवारी मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच उत्तर महाराष्ट्र-गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. पावसाचा थेट परिणाम वाहतूक कोंडीसह लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर होतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App