राहुल सोलापूरकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान, आंबेडकरी संघटना आक्रमक

Rahul Solapurkar

विशेष प्रतिनिधी

पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां बाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असे त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत त्यांच्या विधानाने आंबेडकरी संघटनानी सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातून राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यात आला. काही संघटनांनी आक्रमक होत थेट सोलापूरकर यांच्या घरावर चाल केली. त्यानंतर सोलापूरकरांनी त्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या मागणीवर शिवप्रेमी ठाम आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वाद्‌ग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन खरात म्हणाले, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.

राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे.

Rahul Solapurkar Controversial statement about Babasaheb Ambedkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात