विशेष प्रतिनिधी
नाशिक : Haribhau Bagde ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये भारतातील देवदेवता आणि महापुरुषांची चित्रे होती. कालांतराने ती काढून टाकण्यात आली. आपल्या या दैवतांना घटनेत पुन्हा स्थान देण्यासाठी आवाज उठवण्याची गरज अाहे. त्यासाठी विधिमंडळात हवा तर ठराव आणा,’ अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी येथे केली. त्यापुढे जात या मागणीला कोण विरोध करताे ते पाहू, असे म्हणत त्यांनी आक्रमक पवित्राही घेतला.Haribhau Bagde
नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार मंत्री आशिष शेलार यांना रविवारी बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, संविधानाची पहिली प्रत नाशिकरोड येथील शासकीय मुद्रणालयात छापण्यात आली होती. त्याची प्रतही माझ्याकडे आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंग, महाराणा प्रताप, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, प्रभू श्रीराम आणि नटराजांसारख्या देवांचे व महापुरुषांचे चित्र होते. राष्ट्राच्या स्वाभिमानाची ही चित्रे नंतर काढून टाकण्यात आली. त्यामुळे भारतमातेची लेकरं म्हणून मी आग्रह करतो की ही चित्रे पुन्हा घटनेत परत आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजेत.
शिधापत्रिकांवर छापली स्वातंत्र्यदेवीची विनवण
बागडे म्हणाले, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची अखेरची भेट नाशिकलाच झाली होती. आपण अन्न व नागरी पुरवठामंत्री असताना कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता शिधापत्रिकांवर छापली होती. त्याची परवानगी घेण्यासाठी मी नाशिकला आलो होतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App