वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Finance Minister अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या केंद्रीय मंडळासोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातील प्रमुख प्रस्तावांबद्दल सांगितले ज्यामध्ये आयकरात देण्यात आलेल्या सवलतींचा समावेश आहे. या बैठकीला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.Finance Minister
या बैठकीत अर्थमंत्र्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मंडळाच्या सदस्यांना संबोधित केले आणि अर्थसंकल्पात सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. या बैठकीनंतर, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा, निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
पत्रकार परिषदेत आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, रेपो दरात कपात केल्याने विकास आणि वापराला चालना मिळेल. याशिवाय ते म्हणाले की, आम्हाला भारत अधिक गुंतवणूकदार आणि व्यापार अनुकूल बनवायचा आहे. अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात लोकसभेत सादर केले जाईल.
१२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
१ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आयकराबाबत मोठी सवलत देण्यात आली. नवीन करप्रणालीनुसार, आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. पगारदारांसाठी, ही सूट ७५,००० रुपयांच्या मानक वजावटीसह १२.७५ लाख रुपयांपर्यंत वाढेल. नवीन कर प्रणालीच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. जुन्या करप्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App