Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला तडीपारीची नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले- कोणाचा साला कोणाचा नातेवाईक हे बघून कारवाई नसते!

Manoj Jarange

प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange  मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर जालना पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात 9 वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यात मनोज जरांगे यांचा मेहुणा देखील आहे. विलास खेडकर असे त्याचे नाव आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली होती. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Manoj Jarange

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचा साला आहे, कोणाचा नातेवाईक आहे, याच्यावर कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



दरम्यान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणे घेणे नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही.

पुढे मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Manoj Jarange’s sister-in-law gets deportation notice; Chief Minister says – No action will be taken based on who is his brother-in-law or relative!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात