दिमाखदार पंजाब मेल झाली ११० वर्षांची, रेल्वेच्या शिरपेचातील मानाचा तुरा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील सर्वात जुन्या पंजाब मेलने नुकतेच ११० व्या वर्षात पर्दापण केले. १ डिसेंबर २०२० रोजी एलएचबी कोच लावण्यात आल्याने पंजाब मेलचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. रेल्वेच्या इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी प्रवासी पंजाब मेलमधून सफर करत आहेत.
फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरून मोठ्या प्रमाणात जात होता. पेशावर छावणीत तो संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. Punjab Mail creates history



मुंबई ते पेशावरपर्यंत जाणारी पंजाब मेल कधी सुरू झाली, याबाबत निश्चित माहिती नाही. १२ ऑक्टोबर १९१२ रोजी पंजाब मेल दिल्ली स्थानकावर उशिरा पोहचली होती. त्याबाबत एका प्रवासाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून पंजाब मेलची सुरुवात बेलार्ड पियर मोल स्थानकावरून १ जून १९१२ रोजी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

पंजाब मेलमधून फक्त उच्च वर्गाच्या गोऱ्या साहेबांचा प्रवास होत होता. मात्र, १५ ते १७ वर्षांनी निम्न वर्गातही सेवा पुरवायला सुरुवात झाली. १९३० च्या दशकाच्या मध्यापासून पंजाब मेलमध्ये तृतीय श्रेणीचे डबे दिसू लागले.

Punjab Mail creates history

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात