कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ


देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळूअनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली आहे.Increase in the number of trains due to declining corona patients


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळून अनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहार मधील लोकांची सुविधा पाहता गोरखपुर-पनवेल, दिल्ली-गोरखपूर तसेच छपरा-पनवेल या दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून 12 जून्पासून स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत.या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेशातील झासी, कानपुर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, सीतापुर, बलिया सारख्या शहरांमधून जाणार आहेत. उत्तर रेल्वेनुसार या समर स्पेशल ट्रेन पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता काही स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार येथील ट्रेनचा समावेश आहे. या गाड्या वांद्रे, अहमदाबाद, छपरा, मऊ, समस्तीपुर, गुवाहाटी, राजकोटसह काही शहरांमध्ये धावणार आहेत.

Increase in the number of trains due to declining corona patients

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती