पुण्याच्या गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये रंगणार राजकीय आखाडे; दिसणार मोदी – शिंदे आणि ठाकरे!!

प्रतिनिधी

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात राजकीय आखाडा रंगणे ही काही नवीन बाब राहिलेली नाही. प्रत्येक शहर – गावातील नगरसेवक, आमदार, खासदार, सरपंच, पंचायत समिती सदस्य यांची समर्थक गणेशोत्सव मंडळे असतातच. त्यातच लोकसभा निवडणूक 2024 जवळ आल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात राजकीय आखाडा रंगणार नसता तरच नवल. असा आखाडाचा थेट नेत्यांच्या मूर्तींसह गणेशोत्सवात रंगणार आहे. Pune’s Ganeshotsav scenes will feature political arena

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मूर्ती गणेशोत्सव देखाव्यात दिसणार आहेत. पुण्यातील सुप्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांच्या स्टुडिओमध्ये महत्त्वाच्या नेत्यांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत.

पण गणेशोत्सवाऔ नेत्यांच्या मूर्ती देखाव्यांमध्ये असणे ही बाब अजिबात नवीन नाही. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रूपातले गणपती स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक मंडळांनी बसविले. इतकेच काय पण आणीबाणी नंतर 1977 मध्ये मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधींचा क्लीन बोल्ड केला होता, हा देखावा पुण्यातली पुण्यातल्या मंडळांने सादर केला होता.

गुजरात आणि कर्नाटक मधल्या काही मंडळांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनातील देखावे सादर केले. भडोच मध्ये सावरकरांच्या रूपातील गणपती गेल्या वर्षीच 2022 च्या गणेशोत्सवात बसविला होता.

मुंबईच्या सुप्रसिद्ध लालबाग मंडळांनी वर्षानुवर्षे महान देशभक्तांचा देखावा सादर केला. यामध्ये महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू यांच्या मूर्ती यांच्या रूपातील गणेश मूर्ती हे मंडळाचे वैशिष्ट्य ठरले होते. त्यानंतर 1965 – 1971 ची युद्धे याचे देखावे मंडळाने सादर केले होते. पुण्यातल्या विविध मंडळांनी अशा स्वरूपाचे अनेक वर्ष देखावे सादर केले. आता त्या देखाव्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे आदी नेत्यांची भर पडली आहे.

Pune’s Ganeshotsav scenes will feature political arena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात