पुणेकरांची आता वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.खडकसावला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय.Puneites: Khadakvasla Dam filled 100%, beating the drinks of drinking water, Punekar secure!
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असला तरी पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे.गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे.
त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणेकरांची आता वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.खडकसावला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय.
पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.खडकवासला भरलं, मुठेचं पात्र दुथडी भरुन वाहू लागलंय.
शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
मुळशी धरणात सध्या 94% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी 2000-2300 क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.
भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो.
तर, पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुण्यात सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App