पुण्यातील तुळशीबागेतला बाप्पा पोहोचणार आता साता समुद्रापार!


  • जर्मनीत साजरा होणार गणेशोत्सव !

विशेष प्रतिनिधी

पुणे :  पुण्यात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध गणेशोत्सव आहे . पुण्यातील गणेशोत्सवात असणारे मानाचे पाच गणपती, पारंपारिक पद्धतीनं होणार ढोल वादन , लांबची लांब असणारी विसर्जन मिरवणूक , ती बघण्यासाठी केवळ पुणेकरांच्याच नाही तर हजारो गणेश भक्तांच्या लागलेल्या रांगा हे सगळं समीकरणच इतरांसाठी कुतूहलाचा विषय कायमच असतो . Pune tulshibhag Ganpati Utsav NEWS

पुण्यात साजरा होणारा पारंपारिक गणेशोत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे परदेसी नागरिकांना देखील या गणेशोत्सवाची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही .गणेशोत्सवाची ख्याती केवळ पुण्यात नव्हे तर जगभरात पोहोचली आहे. त्यामुळे आता पुण्याचा गणेश उत्सव जर्मनीत साजरा होणार आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिकृती जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळ म्युनिक या मराठी भाषिकांच्या युरोपमधील एक अग्रणी संस्थेतील गणेशोत्सवात विराजमान होणार आहे.युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी ही कलाकृती साकारली आहे.

रांध्याच्या पर्यावरणपूरक मटेरीअलपासून ही मूर्ती साकारण्यात आली असून जर्मनीतील संस्थेचे प्रतिनिधी अद्वैत खरे यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, गणेश रामलिंग, कोषाध्यक्ष नितीन पंडित, स्वप्नाली पंडित, शिल्पकार विवेक खटावकर, सागर पेद्दी आदी उपस्थित होते.

Pune tulshibhag Ganpati Utsav NEWS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात