”काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी मोदी…” भाजपाने लगावला टोला!


भारत’ शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन ‘भारत जोडो’ म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? राहुल गांधींना केला आहे सवाल!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पॅरीसमध्ये बोलतान हिंदुत्वावरून  भाजपावर टीका केली होती. भाजपाला कसेही करून सत्ता मिळवायची आहे, हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. असं राहुल  गांधी म्हणाले होते. त्यांच्या टीकेला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Where the imagination of Congress leaders stops Modis imagination begins Keshav Upadhyes criticism

केशव उपाध्ये म्हणाले, ”मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का? परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे, मोदींची दूरदृष्टी आणि हिंदुत्व राहुलजींना कधीच कळणार नाही.”

याशिवाय ”काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी मोदींची कल्पनाशक्ती सुरू होते, यातच काय ते आले. राहुल गांधीनी पॅरिसमध्ये जाऊन आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल म्हणे माहिती दिली. ‘भारत’ शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन ‘भारत जोडो’ म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? ‘इंडिया जोडो’ म्हणा ना!” असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते? –

”हिंदू राष्ट्रवाद हा विचार आणि शब्द चुकीचा आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्यांना हिंदू धर्माशी काहीही देणे-घेणे नाही. कुठलेही मोल चुकवून त्यांना सत्ता मिळवायची-टिकवायची आहे. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना काही मोजक्या व्यक्तींच्या हातात सत्ता हवी आहे. त्यांच्यात हिंदू धार्मिकता वगैरे काही नाही.” असं राहुल गांधी यांनी  पॅरिस मधील अग्रगण्य समाजविज्ञान संस्था ‘सायन्सेस पीओ विद्यापीठा’त विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Where the imagination of Congress leaders stops Modis imagination begins Keshav Upadhyes criticism

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!