विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. वनाज ते रामवाडी या मार्गाच्या अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान या 5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या 7 किलोमीटर अंतरावर प्रवाशांसाठी वाहतूक डिसेंबर अखेर सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.Pune residents will be able to travel by Metro till the end of December, a ticket of Rs 10 for the first one kilometer
दिल्ली मेट्रोच्या अनुषंगाने पुणे मेट्रो मार्गासाठी तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या एका किलोमीटरसाठी 10 रुपये तिकीट असणार आहे. त्यानंतर प्रवासाचे टप्पे आणि अंतर जसजसे वाटेल, तसतसा तिकिट दर कमी होईल. महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘नारीशक्ती’ नावाचा स्वतंत्र डबा असणार आहे. मेट्रो स्थानकावर आणि मेट्रो डब्यात सुरक्षिततेसाठी यंत्रणा आल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
सर्व स्थानके आणि डब्यांमध्ये अद्ययावत यंत्रणा असल्याने प्रवास सुरक्षित होईल. सायकलला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी सायकलसह प्रवास करता येणार आहे. सायकलचा वापर करून मेट्रो प्रवास करता येणार असल्याने पहिल्या आणि अखेरच्या टप्पापर्यंत 2 विविध प्रवास सुविधांचे एकत्रीकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
डॉ. दीक्षित आणि मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फुगेवाडी स्थानक ते संत तुकारामनगर स्थानक संत तुकाराननगर स्थानक ते फुगेवाडी स्थानक असा प्रवास केला. या प्रवासा दरम्यान लिफ्टने सायकल फुगेवाडीच्या मेट्रो स्थानकाच्या फलाटावर आणण्यात आली. त्यानंतर मेट्रोच्या डब्यात सायकलसह संत तुकारामनगर स्थानकात मेट्रो पोहोचल्यानंतर लिफ्टद्वारे सायकल बाहेर आणण्यात आल्या. त्याचे प्रात्यक्षिक (गुरुवारी) 26 ऑगस्ट रोजी दाखविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App