‘बंपर -टू-बंपर’ विमा म्हणजे काय ?काय आहेत कार विम्याबाबतचे नियम जे १ सप्टेंबरपासून बदलतील ?


 

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, १ सप्टेंबरपासून नवीन वाहनांसाठी ‘बंपर-टू-बंपर’ विमा असणे अनिवार्य केले पाहिजे. What is ‘Bumpar -To-Bumper’ insurance? What are the rules about the car insurance that will change  1 from September ?


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने आता  कार विम्याबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय . न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, 1 सप्टेंबरपासून नवीन वाहनांसाठी ‘बंपर-टू-बंपर’ विमा असणे अनिवार्य केले पाहिजे.

हा विमा सध्याच्या कार विम्यापेक्षा वेगळा असेल.ड्रायव्हर, प्रवासी आणि कार मालक कार खरेदीवर पाच वर्षांसाठी विमा उतरवतात.

“बंपर टू बंपर” विमा किमान पाच वर्षांसाठी आवश्यक

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “बंपर टू बंपर” विमा किमान पाच वर्षांसाठी आवश्यक आहे.1 सप्टेंबरनंतर जेव्हा एखादी कार विकली जाईल, तेव्हा ही स्वतंत्र विमा पॉलिसी आवश्यक आहे. यादरम्यान चालक, प्रवासी आणि कार मालक यांचे कव्हरेज वेगळे असेल. सध्याच्या नियमानुसार, कार खरेदी केल्यानंतर पाच वर्षांच्या पुढे बंपर विमा वाढवण्याचे कोणतेही धोरण नाही.मद्रास उच्च न्यायालय एका प्रकरणात न्यू इंडिया इन्श्युरन्सच्या वतीने रिट याचिकेवर सुनावणी करत होते. ७ डिसेंबर२०१९ रोजी इरोड विशेष जिल्हा न्यायालय (मोटर अपघात दावा न्यायाधिकरण) च्या निर्णयाला विमा कंपनीने आव्हान दिले होते.

आपल्या याचिकेत न्यू इंडिया इन्श्युरन्सच्या वतीने असे म्हटले गेले होते की, कंपनी केवळ थर्ड पार्टीमुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार आहे. जर कार चालकाच्या बाजूने अपघात झाला तर कंपनी या नुकसानास जबाबदार नाही.

न्यायालयाने म्हटले होते की, जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करते तेव्हा विम्याबद्दल ना संपूर्ण माहिती शेअर केली जाते आणि ना ग्राहकांना त्यात रस असतो. एखादी खरेदीदार कार खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार आहे ही वाईट बाब आहे, परंतु विमा खरेदी करताना तो थोड्या रकमेसाठी मागे सरकतो

What is ‘Bumpar -To-Bumper’ insurance? What are the rules about the car insurance that will change from September 1?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती