सावधान ! गॅस एजन्सी तुमच्याकडून सिलेंडरचे जास्त पैसे घेतेय , कुठे कराल तक्रार , वाचा सविस्तर 


घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता. Be careful! Gas Agency’s more money from you to pay the cylinder, where to do


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : सध्याच्या काळात आणि डिझेल तर महाग झालयच पण या सोबतच आता घरगुती सिलिंडरच्या (LPG) दरातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक कंटाळले  आहेत.

अशातच काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे. घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता.

त्यासाठी तुम्हाला केवळ एक ट्विट करावे लागेल. त्यानंतर MoPNG e-Seva या सरकारी विभागाकडून संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई केली जाईल.

घरगुती सिलिंडरची नोंदणी, मग सिलेंडर वेळेत मिळणं, सिलिंडर पोहोचवणाऱ्याने कटकट न करता घरपोच आणून देणे या आजच्या काळातही अनेक जणांच्या घरातले डोकेदुखी ठरू शकतील असे विषय. पुन्हा गॅस सिलेंडरवाला पावती कमीची देतो आणि मागतो जास्त पैसे, असा अनुभव तुम्हाला आला असेल .



तसेच तुम्ही एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर घरी पोहोचवला जात नसल्यास एजन्सी लगेच बदलू शकता. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, खादा ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाविषयी समाधानी नसेल तर तो दुसऱ्या गॅस एजन्सीत कनेक्शन ट्रान्सफर करु शकतो. सुरुवातीच्या काळात ही सुविधा फक्त एकदाच वापरता येईल.

ही सुविधा सुरुवातीला चंदीगड, पुणे, कोईम्बतूर आणि गुडगावमध्ये सुरु केली जाईल. त्यानंतर टप्याटप्प्याने देशभरात ही सुविधा मिळेल. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना ग्राहकाला कोणत्या एजन्सीकडून सिलेंडर घ्यायाचा हे ठरवता येईल.

आपली तक्रार नोंदवण्यासाठी, कृपया आपल्या सेवा प्रदात्याचे नाव (IOCL, BPCL किंवा HPCL), 17 अंकी LPG ID, ग्राहक क्रमांक, एजन्सीचे नाव, जिल्हा, स्थान आणि आपला नोंदणीकृत संपर्क क्रमांक शेअर करा जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकू.

ही सुविधा लवकरच प्रायोगिक तत्वावर सुरु केली जाईल. जेणेकरून गॅस एजन्सीजना सुधारणेची एक संधी मिळेल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी सांगितले. यामुळे स्पर्धा निर्माण होऊन गॅस एजन्सीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारेल. जेणेकरून ग्राहकांना आणखी चांगली सेवा मिळेल.

Be careful! Gas Agency’s more money from you to pay the cylinder, where to do

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात