पोर्शे कार अपघाताबाबत शिंदे – फडणवीस आक्रमक; फडणवीसांची पुणे आयुक्तालयात बैठक; अजितदादांची पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पोर्शे कार अपघातातील बड्या बिल्डरच्या आरोपी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचे पर्सेप्शन संपूर्ण महाराष्ट्रभर तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमकतेने ॲक्शन मोडमध्ये आले. एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त यांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अचानक भेट देऊन तिथे पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपास चक्र वेगाने फिरवण्याचे स्पष्ट आदेश दिले. Pune Car Accident Case shinde fadnavis pune ayukt meet

त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आल्याची बातमी आली. त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना तपासा संदर्भात सूचना दिल्या. एकूणच बड्या बापाच्या माजोरड्या मुलाने दोन तरुणांचे जीव घेतल्यानंतर 3 दिवसांनंतर कारवाई मध्ये कठोरता दिसली.

पुण्यातील बडा बिल्डर ब्रह्मा कॉर्पचा प्रमुख विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवाल पोर्शे कार अत्यंत वेगात चालवत दोन मुलांना उडवले त्यात एक मुलगा आणि एक मुलगी यांचा समावेश होता. त्या दोघांचा मृत्यू झाला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी वेदांत अग्रवाल या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुण्याच्या राजकीय क्षेत्रातून झाला त्यानंतर वेदांत अग्रवाल याला काही तासांमध्येच जामीन मिळाला. तो 17 वर्षांचा असल्याने अल्पवयीन असल्याचे कारण दाखवून त्याची जामीनावर सुटका झाली. घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घेतले नाही. वेदांत विरोधात सौम्य कलमे लावली यात मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाणघेवाण झाली, असे आरोप राजकीय क्षेत्रातून झाले. त्यामुळे पुणे पोलीस आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे अडचणीत आले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घातले. फडणवीस यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात येऊन पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. फडणवीसांनी लक्ष घातल्याबरोबर 24 तासांमध्ये वर्षे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली. ज्या पब मध्ये वेदांत अग्रवाल दारू प्यायला आणि जेवण केले. त्याचे 48 हजार रुपयांचे बिल भरले, तो पब पोलिसांनी सील केला. अपघात प्रकरणात नाव आलेले वेदांत अग्रवाल याचे वडील ब्रह्मा कॉर्प चे प्रमुख विशाल अग्रवाल फरारी झाले होते. छत्रपती संभाजी नगर मधून पोलिसांनी अटक केली. एकूण 7 जणांना अटक केली. यापैकी 5 जणांना 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आरोपीवर अल्पवयीन नव्हे, तर प्रौढ आरोपीचाच खटला चालणार

पोर्शे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल (वय 17) हा अल्पवयीन असला आणि त्याला न्यायालयाने 15 तासांमध्ये जामीनावर सोडले असले, तरी प्रत्यक्षात या आरोपीवर अल्पवयीन म्हणून नाही, तर प्रौढ आरोपी म्हणूनच खटला चालवावा, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाला केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अपघातातील दोन मृतांच्या नातेवाईकांना काही लोकांनी धमक्या दिल्याची तक्रारी पोलिसांच्या कानावर आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात त्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही, तरी देखील धमक्या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातले असून धमक्या देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर या सगळ्या प्रकरणात राजकीय क्षेत्रातून प्रचंड भडीमार झाला. ते आरोपी वेदांत अग्रवाल याला वाचवत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर सुनील टिंगरे यांनी पुढे येऊन खुलासा केला आणि आपला या प्रकरणात कुठलाही संबंध नसल्याचा कानावर हात ठेवला.

पोर्शे कार हिट अँड रन केसमधला आरोपी कितीही मोठा असला, तरी या अपघात प्रकरणात अडकलेल्या कोणालाही सोडू नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले. त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर पुणे पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपी वेदांत अग्रवालचे वडील ब्रह्मा कॉर्पचे मालक विशाल अग्रवाल, त्यांचा ड्रायव्हर याच्यासह 7 जणांना अटक केली. अपघातानंतर विशाल अग्रवाल फरारी झाले होते. त्यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर म्हणून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये पब मालकासह पब व्यवस्थापक आणि काउंटर व्यवस्थापक याचाही समावेश आहे.

Pune Car Accident Case shinde fadnavis pune ayukt meet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात