विशेष प्रतिनिधी
पुणे : लोहगाव येथील पुणे विमानतळाला ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणे अपेक्षित आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ४७५ कोटी खर्चून बांधकामाचे काम हाती घेतले आहे. नवीन आणि जुन्या टर्मिनलची प्रवासी हाताळणी क्षमता प्रतिवर्ष १.६ कोटी प्रवाशांची असेल. Pune Airport will get a new terminal building
नवीन टर्मिनलचे सध्याच्या टर्मिनलसह एकत्रिकरण करण्यात येत आहे. याचे क्षेत्रफळ ७ लाख ५० हजार चौरस फूट असेल आणि प्रवासी हाताळणी क्षमता १६ एमपीपीए त्यामुळे विमानतळाची क्षमता वाढणार आहे.
५५ टक्के काम पूर्ण
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) पुणे विमानतळावर वर्धित क्षमतेसह आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ज्यामुळे विमानतळावरील घाईच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल. एएआयने टर्मिनल इमारतीचे बांधकाम हाती घेतले आहे. यापैकी ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App