मुंबई महापालिकेत लालूंचा पक्ष आणि मुस्लिम लीगशी युती करून प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेना – काँग्रेसला दरवाजे खुले!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या दोन पक्षांची युती जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे राजकीय वक्तव्यही केले आहे.Prakash Ambedkar said by forming an alliance with the Muslim League

प्रकाश आंबेडकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाशी आघाडी करून लढविली होती. परंतु, आता ते आयएमआयएम पक्षाशी त्यांची युती राहिलेली नाही. ओबीसी समाजाने एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेतून औरंगाबादमध्ये मतदान केले होते.


एआयएमआयएम रॅलीवरून राजकीय संघर्ष; मुंबईत १४४ कलम; पक्षाचे नेते रॅलीवर ठाम


परंतु खासदार ओवैसी यांच्या पक्षानेच्या ओबीसींना त्याच दृष्टिकोनातून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती केली नाही, असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आमच्या समवेत येऊ शकतात आमचे दरवाजे या दोन्ही पक्षांची आघाडी करण्यासाठी खुले आहेत, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेसचे देखील बर्‍यापैकी नगरसेवक आहेत. हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावर लढून तिथे सत्तेवर येऊ शकतात,अशी स्थिती आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे राजकीय बळ, मुस्लिम लीगचे राजकीय बळ आणि राष्ट्रीय जनता दलाचे राजकीय बळ मुंबईत अक्षरश: तोळामासा आहे आणि अशा कमी राजकीय बळाचे तीन पक्ष एकत्र येऊन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासारख्या मोठ्या पक्षांना आमचे दरवाजे खुले आहेत, असे सांगून आघाडीसाठी आवाहन करताना दिसत आहेत. या आवाहनाला शिवसेना आणि काँग्रेसचे नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Prakash Ambedkar said by forming an alliance with the Muslim League

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात