पोर्शे कार अपघात ही तर सलमान सारखी केस; माजलेल्या बापाच्या मुलाला अद्दल घडवा; शिंदे सेनेची कठोर भूमिका!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातला पोर्शे कार अपघात ही सलमान खान याच्या हिट अँड रन सारखीच केस आहे. त्यामुळे माजलेल्या बापाच्या मुलाला चांगली अद्दल घडवा, अशी कठोर भूमिका शिंदे सेनेने घेतली.  Porsche car accident is a case like Salman khan

पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघातामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी पोलिसांना फटकारत पोलिस आयुक्तांना बडतर्फ करा, अशी मागणी केली, तर आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेऊन माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. हे सलमानसारखंच हिट अँड रन प्रकरण आहे. यातल्या आरोपवीर कठोर कारवाई झाली पाहिजे. याची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिरसाट यांनी केली.

काय म्हणाले संजय शिरसाट ?

ते माजलेल्या बापाची मुलं असतात. त्यांच्याकडून असे अपघात होत असतील तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. याला पक्ष नाही, याला जात नाही, याला धर्म नाही. कोणत्याही गरिबाच्या, सर्वसामान्याच्या शरीरावर गाडी चालवायची, आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. मग हे फरार होतात. अशा लोकांना कोणीही पाठिशी घालणार नाही. तो कितीही मोठ्या बापाचा लेक असला तरीही!! हे सलमान सारखंच प्रकरण झालं ना. अनेक लोक बेधुंद होऊन गाड्या चालवतात, ते मोठ्या घरचे असेल तर काय झालं ? सामान्य लोकांचा जीवही तितकाच महत्वाचा आहे. याप्रकरणी न्यायालयाने जो आदेश दिला, त्याचं पालन झालंच पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच या अपघाताची एसआयटी मार्फतही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही शिरसाट यांनी केली.

पुण्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात पोर्शे गाडीने दुचाकील जोरदार धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली, मात्र काही तासांतच त्याची जामीनावर सुटका झाली. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड पेटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी अलपवयीन आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांनाही अटक केली आहे. या अपघातानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते त्यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली.

– दारू पितानाचे सीसीटीव्ही फुटेज

शनिवारी जेव्हा हा अपघात घडला त्याच्या काही काळ आधी तो अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये गेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुमारे ३० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका टेबलवर ४-५ लोक बसलेले दिसत आहेत. समोरच्या टेबलवर अनेक ग्लास, दारूच्या बाटल्या आणि इतरही अनेक ड्रिंक्स ठेवलेली दिसत आहेत. थोड्या वेळाने ती लोकं उठून बाहेर जाताना दिसले.

Porsche car accident is a case like Salman khan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात