Ashadhi Wari 2021 : कोरोनाची दुसरी लाट राज्यातून हळूहळू ओसरताना दिसत आहे. तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकारने निर्बंध लादलेले आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारने नियमावली जाहीर केलेली आहे. यानुसार पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकरांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Police detained Bandatatya Karadkar For violeting covid rules Of Ashadhi Wari 2021 Pandharpur
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाची दुसरी लाट राज्यातून हळूहळू ओसरताना दिसत आहे. तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकारने निर्बंध लादलेले आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारने नियमावली जाहीर केलेली आहे. यानुसार पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकरांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तत्पूर्वी, बंडातात्या कराडकर म्हणाले होते की, समूहाने न जाता वारकरी टप्याटप्याने पंढरपूरकडे पायी जातील. त्यानुसार आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले असता पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. दिघीमधील संकल्प मंगल कार्यालयात बंडातात्या कराडकर यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वारकरी आक्रमक झाले आहे. पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी संकल्प मंगल कार्यालयाच्या बाहेर भजनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, दिंडी निघालेली असल्याने आता थांबणं शक्य नाही, पायी वारी पूर्ण करणारचं, अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतली आहे. पायी वारीसाठी आपण आळंदीत दाखल होणार असल्याचा इशारा बंडातात्या यांनी दिला होता. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून झाले. परंतु, बंडातात्या कराडकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. अशातच आज पहाटे काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली असता त्यांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले. त्यावेळी वारकऱ्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या बंडातात्या कराडकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
Police detained Bandatatya Karadkar For violeting covid rules Of Ashadhi Wari Pandharpur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App