हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार क्र.MH 14 – BX – 8326 ही कार फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली.हल्लेखोरांनी हल्ल्याची कबूली दिली आहे.Police arrest four assailants who attacked Santosh Parab; He confessed to the attack
विशेष प्रतिनिधी
कणकवली : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणारे चौघा हल्लेखोरांना कारसह पोलिसांनी पकडले आहे.हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार क्र.MH 14 – BX – 8326 ही कार फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली.हल्लेखोरांनी हल्ल्याची कबूली दिली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, ऍडिशनल एसपी नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची कसून चौकशी केल्याचे समजते.दरम्यान चारही आरोपींना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता चौघांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही. परंतु परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App