बारामतीत विमान दुर्घटना, पुन्ह एक शिकाऊ विमान कोसळलं, वैमानिक जखमी

अवघ्या दोन दिवसांपूर्वीत  घडली होती विमान दुर्घटना

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यात विमान दुर्घटना सुरूच असल्याचे दिसत आहे.  कारण, अवघ्या दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये विमान कोसळल्याची दुर्घटना घडलेली असताना, आज सकाळी पुन्हा एका शिकाऊ विमानाची दुर्घटना घडली आहे.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वैमानिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. Plane crash in Pune another training plane crashes Pilot injured

तांत्रिक बिघाड झाल्याने  रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचं VT-RBT विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत  पायलट ट्रेनर आणि एक ट्रेनी पायलट असे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र गेल्या  काही दिवसांपासून सातत्याने विमान कोसळण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.  या  दुर्घटना  टाळण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात अशी  मागणीही नागरिकांमधून होत आहे.

Plane crash in Pune another training plane crashes Pilot injured

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात