पवारांची डबल गेम : विधिमंडळ राष्ट्रवादी पक्षात फूट न दाखवता काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदापासून वंचित ठेवण्याचा डाव!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे बाकीचे नेते आपापसात फूट पडल्याचे बाहेर दाखवत असले तरी प्रत्यक्षात एक वेगळा डाव खेळत असल्याचे उघड होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ असे आमदारांचे दोन गट तयार झाले असले तरी प्रत्यक्षात विधिमंडळात हे दोन गट झाल्याचे न दाखवता राष्ट्रवादीचे संख्याबळ जसेच्या तसे तांत्रिकदृष्ट्या टिकवून ठेवून काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पदापासून वंचित ठेवण्याचा डाव पवार काका – पुतण्या खेळत असल्याचे दिसत आहे. Pawar double game, preventing Congress to take opposition leaders post

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन उद्या सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ या दोन्ही गटांनी आपापल्या आमदारांना व्हिप बजावले आहेत. पण हे व्हिप सर्व आमदारांना लागू होत असल्याचे एकमेकांचे दावे आहेत. आता कोण कोणाचे व्हिप पाळतो हे विधिमंडळात स्पष्ट झाले, तर शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ गटाकडे नेमके किती आमदार ही संख्या उघड होईल. पण ती संख्या उघड झाल्याने राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट होऊन संख्याबळ दोन्ही बाजूंची घटल्याचेच दिसेल आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते पद गमवावे लागेल.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद द्यावे लागेल. त्यामुळे विरोधकांची सूत्रे काँग्रेसच्या हातात जाण्याची शक्यता आहे. तशी सूत्रे काँग्रेसच्या हातात जाऊ नयेत यासाठी पवार काका – पुतण्या काही डाव खेळत असल्याचे समोर येत आहेत. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षात फूट पडलेली उघड दाखवायची नाही. व्हिप बजावला असला तरी तो अंमलात येईल, अशा पद्धतीची कुठलीही कार्यवाही करायची नाही असे दोन्ही बाजूंनी ठरविल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन भेट घेणे हा राष्ट्रवादीच्या एकूण व्यापक खेळीतला एक छोटा भाग आहे.

एकीकडे अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्तेची फळे चाखत राहायची आणि दुसरीकडे शरदनिष्ठ काँग्रेसच्या हाती विरोधी पक्षांची सूत्रे ठेवायची हा तो डाव आहे. यासाठी विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवायचे नाही हा दोन्ही बाजूंनी स्वीकारलेला तडजोडीचा मार्ग आहे.

Pawar double game, preventing Congress to take opposition leaders post

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात