लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना झटका; ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष ‘एसबीएसपी’ एनडीएमध्ये सामील!


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर केली घोषणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना जोरदार झटका बसला आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये NDA मध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी राजभर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली, त्यानंतर त्यांनी आघाडीत सामील होण्याची घोषणा केली. A shock to the opposition ahead of the Lok Sabha elections Omprakash Rajbhars party SBSP joins NDA

अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीत ओम प्रकाश राजभर यांनी भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो.”

याचबरोबर ‘’राजभर यांच्या आगमनाने उत्तर प्रदेशमध्ये एनडीए मजबूत होईल आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली युतीकडून गरीब आणि दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल.’’ असेही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

A shock to the opposition ahead of the Lok Sabha elections Omprakash Rajbhars party SBSP joins NDA

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात