पवार नमस्कार करत फिरायला सुरुवात करण्याआधी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी त्यांना नमस्कार घातला, मग कोणाची राष्ट्रवादी राहील उभी??


शरद पवार नुसते महाराष्ट्रात नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहील, असे आत्मविश्वासी वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतल्या शरदनिष्ठ गटाचे नेते सुखावले होते. आपले साहेब महाराष्ट्रात फिरून जनतेला नमस्कार करणार त्यामुळे आपला पक्ष पुन्हा उभा राहणार. त्यामुळे आपल्याला राजकीय संजीवनी मिळणार याची त्यांना खात्री वाटू लागली… पण तेवढ्यात अजितनिष्ठ गटाच्या 9 मंत्र्यांनी शरद पवारांपुढे आज नमस्कार घातला. विठ्ठला, आम्हाला संभाळ असे छगन भुजबळ म्हणाले. बाकीच्या सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद मागितले. Pawar double game; which NCP will stand and with whom??

पण जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार या 9 मंत्र्यांनी पवारांपुढे दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झाला आहे, की कोणी कोणाला नमस्कार घातल्यामुळे कोणती राष्ट्रवादी उभी राहणार??, अजितनिष्ठ की शरदनिष्ठ??

शरद पवारांना राष्ट्रवादी उभे करण्यासाठी महाराष्ट्रात नमस्कार करत फिरण्याचा साधा सोपा फॉर्म्युला बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. पण पवारांनी तो अद्याप अंमलात आणायचा आहे. तो आणण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे 9 मंत्री अजितदादांसह यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांना नमस्कार घातले. या नमस्कारातून आपली राष्ट्रवादी उभी करण्याचा अजितनिष्ठ गटाचा इरादा दिसला, पण ही राष्ट्रवादी फक्त स्वतःहून उभी राहून चालणार नाही, तर शरद पवारांच्या आशीर्वादाचा टेकू त्याला लागेल, याचे भान या 9 मंत्र्यांना असल्याने पवार स्वतः नमस्कार घालण्यासाठी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करण्यापूर्वीच हे मंत्री पवारांना नमस्कार घालायला गेले. पवारांनी या नमस्कारांवर आशीर्वाद सूचक मौन बाळगले. राष्ट्रवादी पुन्हा एकसंध करण्याचा प्रस्ताव फुल्ल पटेल यांनी पवारांना दिला त्यावर पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, असे पटेल म्हणाले.


अजित पवार गटाने अचानक शरद पवारांची भेट घेतल्यावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…


पण पवारांनी त्यावर सूचक मौन बाळगल्याने राष्ट्रवादी मूळात खऱ्या अर्थाने फुटली आहे का??, फुटली असेल तर विधिमंडळ पक्षात फूट पडून प्रत्यक्षात दोन गट अस्तित्वात आणण्याची अंमलबजावणी होणार आहे का??, तसे दोन गट अस्तित्वात आले तर ते परस्परविरोधी राजकीय भूमिका घेऊन एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत का?? निवडणुकीत हे दोन गट खऱ्या अर्थाने एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करून एकमेकांना पाडणार आहेत का?? असे एकापाठोपाठ एक प्रश्न तयार झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पवारांच्या मनात दडली आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यानुसार राष्ट्रवादी उभी करण्यासाठी शरद पवार अजून महाराष्ट्रात नमस्कार करत फिरायला सुरुवात करायचे आहेत. कारण सध्या पावसाळा आहे. पावसात पवारांना महाराष्ट्रात नमस्कार करत फिरणे तेवढे शक्य होणार नाही. दरम्यानच्या काळात अजितनिष्ठांनी पवारांना नमस्कार घातल्याने ते स्वतःचीच राष्ट्रवादी परस्पर उभी करतील का?? आणि त्यांची उभी राहिलेली राष्ट्रवादी भाजपच्या पाठीशी उभी राहते आहे हे शरद पवारांना सहन होईल का?? हाही महत्त्वाचा मुद्दा आहे!!

पवार नेहमी डबल गेमचे राजकारण करतात त्यामुळे पवारांनी घातलेले नमस्कार आणि केलेले आवाहन राष्ट्रवादी उभे करण्यासाठी निश्चित उपयोगी पडेलही… पण त्यातून नेमकी कोणाची राष्ट्रवादी उभी राहील आणि उभी राहिलेली राष्ट्रवादी दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभी राहील??, हा मात्र मुद्दा चर्चेचा राहील. पवारांचे मौन सुटेपर्यंत आणि ते मौन सुटल्यानंतर त्यांची प्रामाणिक भूमिका समजेपर्यंत त्याचे खरे उत्तर मिळणार नाही…!!… महाराष्ट्र शरद पवारांच्या नमस्कार यात्रेच्या प्रतीक्षेत आहे.

Pawar double game; which NCP will stand and with whom??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात