राष्ट्रवादी मंत्र्यांच्या “पवार दर्शनाचे” राजकीय इंगित बाहेर; राष्ट्रवादीच्या व्हिपचे गौडबंगाल उद्या उलगडणार!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याची विनंती केली. मात्र या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील या दोन नेत्यांची वेगवेगळी व्हर्जन्स समोर आली आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना सर्वांनी राष्ट्रवादी एकासंध ठेवण्याची विनंती केल्याचे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याचे सांगितले. पण पवारांनी सूचक मौन बाळगल्याचे ते म्हणाले.Pawar double game exposed, will NCP apply whip to its mlas??

त्या उलट जयंत पाटलांनी मात्र राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले. यातला “दिलगिरी” हा शब्द प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या निवेदनात वापरला नव्हता. जयंत पाटलांचे बाकीचे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याशी मिळते जुळते होते.


बारसूमध्ये पवारांचे पुन्हा “लक्ष”; जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीने सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला


मात्र या भेटीतले राजकीय हिंदीत जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यातून समोर आले. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सुरू होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आमदारांना व्हिप बजावले आहेत. हे व्हिप अर्थातच परस्परविरोधी असल्याने नेमका कोणता व्हिप आमदार पाळतात, हे समजल्यानंतर शरदनिष्ठ गटाकडे किती आमदार आणि अजितनिष्ठ गटाकडे किती आमदार याचा आकडा विधिमंडळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हा आकडा “बाहेर फुटू” नये आणि व्हिपच्या निमित्ताने विधिमंडळ राष्ट्रवादी कोणताही आमदार कायदेशीर दृष्ट्या तरी अपात्र ठरू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळू न देण्याचा डाव

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी परस्पर विरोधी व्हिप जारी केला तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ येऊ नये यासाठी विधिमंडळातील वेगवेगळी आयुधे उद्या वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एक फायदा राष्ट्रवादीच्या दृष्टीने होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे विधिमंडळ पक्षात राष्ट्रवादी फूट पडलेली दिसली नाही तर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार नाही. त्यामुळे विरोधक विस्कळीत राहतील. असे विविध हेतू मनात ठेवून राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शरद पवारांचे भेट घेतल्याचे समजते. आता ही व्हिपच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने कशी फलद्रूप होते??, हे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनातूनच स्पष्ट होईल.

Pawar double game exposed, will NCP apply whip to its mlas??

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात