पवारांची डबल गेम पार्ट 2 : प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादी ऐक्याचा प्रस्ताव, पण तासभराच्या चर्चेनंतर पवारांचे मौन!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या समावेत अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. Pawar’s Double Game Part 2: Praful Patel’s Proposal for Nationalist Unity

शरद पवारांना राष्ट्रवादी ऐक्याचा प्रस्ताव दिल्याचे पटेल म्हणाले. पवारांनी तासभर आमचे म्हणणे ऐकून घेतले. पण कोणतेही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही असे सांगून पवारांचे “सूचक मौन” प्रफुल्ल पटेल यांनी व्यवस्थित सूचित केले.


अजितदादांची काल सिल्वर ओकला भेट, आज नाशकात शक्तिप्रदर्शन; काका – पुतण्याचे “गोळा बेरीज” राजकारण!!


शरद पवार आमचे नेते आहेत. कोणतीही आधी अपॉइंटमेंट न घेता आम्ही त्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली. त्यांनी आमचे म्हणणे सुमारे तासभर शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या पाया पडून आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादी एकसंध राहील त्याचा आपण विचार करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली, असे प्रफुल्ल पटेल यांनी त्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. मात्र त्याचवेळी पटेल यांनी शरद पवारांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले पण कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही असे सांगून पवारांनी सूचक मौन बाळगल्याचे सूचित केले.

शरद पवार उद्या बंगलोर मधल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मूळात राष्ट्रवादी फुटली असल्याने पक्षातच ऐक्य साधण्याचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना देऊन एक प्रकारे गुगली टाकली आहे. आता या गुगलीचा पवार कसा मुकाबला करतात की तो बॉल सोडून देतात आणि विरोधी आयुष्याच्या बैठकीला सामील होऊन आपली डबल गेम पुढे चालू ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pawar’s Double Game Part 2: Praful Patel’s Proposal for Nationalist Unity

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात