भाजपकडून खासदारांची फोडाफोडी, की पवारांच्याच खासदारांची सत्तेच्या वळचणीला जायची उताविळी??

नाशिक : ज्या अर्थी वास येतोय, त्या अर्थी काहीतरी शिजत असल्याचा विशिष्ट “जावईशोध” काँग्रेसनिष्ठ माध्यमांनी लावून भाजप आता राष्ट्रवादी (शप) शिवसेना (उबाठा) पक्षांचे खासदार फोडणार याची वातावरण निर्मिती चालवली आहे. भाजप किंवा पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अधिकृतरित्या त्यावर कुठलेही भाष्य केलेले नाही, पण म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातून तसे “सिग्नलच” मिळत नाहीत, असे म्हणायची स्थिती पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवलेली नाही.

महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत असले, तरी केंद्रामध्ये मोदी सरकार नितीश कुमार यांचा जदयू आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम यांच्या टेकू वर अवलंबून आहेत. त्यामुळे ते अवलंबित्व कमी करण्यासाठी भाजप शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म सोल्युशन शोधताना पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून त्यांचे खासदार आपल्याकडे ओढण्याच्या बेतात असल्याच्या बातम्या काँग्रेसनिष्ठ माध्यमांनी चालविल्या आहेत. यामध्ये भाजपकडून खासदारांची फोडाफोडी हा “फोकस पॉइंट” आहे. म्हणजे भाजपला इतर पक्षांचे खासदार फोडून आपल्याकडे ओढण्याची घाई झाली आहे, असे दाखवण्याचा या बातम्यांमधून प्रयत्न केला आहे.

त्यासाठी बातम्यांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क दिले आहेत. त्यात मोदींना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा कसा अडथळा आहे, हे समजावून सांगण्यासाठी वक्फ बोर्ड कायदा सुधारणा किंवा एक देश एक निवडणूक कायदा याची उदाहरणे दिली आहेत, जणू काही भाजपने इतर पक्षांचे खासदार फोडले, तर भाजप चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना सोडून देईल किंवा ते दोघे भाजपला सोडून देतील, अशी वातावरण निर्मिती केली आहे. ज्याचे पुरावे माध्यमांनी दिलेले नाहीत.


Narayan Rane मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवेल इतकी भाजपची ताकद, नारायण राणे यांचा विश्वास


परंतु प्रत्यक्षात भाजपने खासदार फोडण्यापेक्षा पवारांचे खासदार आणि ठाकरेंचे खासदार हेच भाजपकडे यायला प्रचंड उत्सुक आहेत किंबहुना सत्तेच्या वळसणीला येऊन बसायला उतावळे झाले आहेत, हे राजकीय सत्य मात्र काँग्रेसनिष्ठ माध्यमांनी झाकून ठेवले आहे.

पवार + ठाकरे कॅम्प मधले “सिग्नल”

कारण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून पवार आणि ठाकरे यांच्या कॅम्पमधून जे “सिग्नल” मिळाले, ते “सिग्नल” त्यांच्या खासदारांची आणि बाकीच्या नेत्यांची सत्तेसाठी उताविळीच दाखवते, मग त्यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंकडून फडणवीसांची होणारी मनधरणी असो किंवा पवारांवर खासदारांचा अजितदादांच्या सत्तेला सत्तेच्या वळचणीला जायला आग्रह असो, या दोन्हीही “सिग्नल”नी ठाकरे + पवारांच्या पक्षातली अस्वस्थता दाखवली. मात्र ही अस्वस्थता काँग्रेसनिष्ठ माध्यमांनी टिपली नाही किंवा टिपली असेल, तर ती दाखवली नाही. त्या उलट भाजपच पवार + ठाकरेंचे खासदार फोडायच्या मागे लागल्याची वातावरण निर्मिती करण्यात काँग्रेसनिष्ठ माध्यमांनी धन्यता मानली आहे.

Pawar camp MP’s eager to join BJP lead power eaves

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात