Sukma-Bijapur border : सुकमा-बिजापूर सीमेवर चकमक; 3 नक्षलवादी ठार, DRG, STF आणि कोब्रा टीमने माओवाद्यांना घेरले; शोध मोहीम सुरू

Sukma-Bijapur border

वृत्तसंस्था

जगदलपूर : Sukma-Bijapur border  छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर गुरुवारी सकाळी पोलिस-नक्षलवादी चकमक झाली. यामध्ये 3 नक्षलवाद्यांना जवानांनी ठार केले आहेत. सध्या शोधमोहीम सुरू आहे. डीआरजी, एसटीएफ आणि कोब्रा टीमने नक्षलवाद्यांच्या बटालियन क्रमांक-1 परिसराला वेढा घातला आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.Sukma-Bijapur border



मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही भागात माओवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 8 जानेवारीला डीआरजी, कोब्रा आणि सीआरपीएफच्या जवानांना सुकमा येथून शोध मोहिमेत बाहेर काढण्यात आले. जेव्हा सैनिक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा माओवाद्यांनी गुरुवारी 9 जानेवारीला सकाळी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.

विजापूरमध्ये नक्षलवादी स्फोट, 8 जवान शहीद

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा स्फोट केला आहे. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात एका चालकाचाही मृत्यू झाला. बस्तर रेंजच्या आयजींनी स्फोटाला दुजोरा दिला आहे.

Encounter on Sukma-Bijapur border; 3 Naxalites killed, DRG, STF and Cobra team surround Maoists; Search operation begins

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात