प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर लगेचच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या देखील अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली आहे. पण राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची अयोध्या दौऱ्याचा देखील विरोध सुरू झाला आहे. Opposition to Aditya Thackeray’s visit to Ayodhya after Raj Thackeray
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला महाराणा प्रताप सेनेने विरोध केला आहे. या सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य ठाकरे यांचे राम मंदिर भेटीसाठी अयोध्येत स्वागतच आहे. त्यांचे आजोबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात फार मोठे योगदान दिले आहे. मात्र केवळ मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि ते सोनियाभिमुख झाले आहेत. त्यामुळे अशा लोकांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा राजवर्धन सिंह यांनी दिला आहे.
Raj Thackeray : भोंग्याविरुद्ध मनसेचा कल्ला; पण श्रेयावर मुख्यमंत्र्यांच्या नावाने शिवसेनेचा श्रेयावर डल्ला!!
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध
जोपर्यंत राज ठाकरे हे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी सुरुवातीला उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे ब्रिजभूषण सिंह नाराज आहेत. राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध महाराष्ट्रात छेडलेल्या आंदोलनांमुळे उत्तर भारतीयांचा फार मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App