अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ची प्रेरणा, ८७ वर्षांचे माजी मुख्यमंत्री झाले दहावीबरोबर बारावी पास!


अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ या चित्रपटाची प्रेरणा असलेले हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी केवळ दहावी नव्हे, तर इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे. Abhishek Bachchan’s ‘Dasvi’ Inspiration, the 87-year-old former Chief Minister passed 12th with 10th!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ या चित्रपटाची प्रेरणा असलेले हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी केवळ दहावी नव्हे, तर इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

ओमप्रकाश चौटाला यांनी दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत १०० पैकी तब्बल ८८ गुण प्राप्त केले आहेत. त्यांनी २०२१मध्ये हरयाणा ओपन बोडार्तून त्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, ५ ¸ऑगस्ट रोजी त्यांचा निकाल रोखण्यात आला होता. याचे कारण म्हणजे त्यांनी दहावीच्या इंग्रजीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण नव्हते. काही कारणास्तव त्यांना २०१९मध्ये परीक्षा देता आली नाही. आता त्यांनी ती उत्तीर्ण केली असून एकाच वेळी त्यांचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

ओम प्रकाश चौटाला हे शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये २०१३ ते जुलै २०२१ या कालावधीत तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होते. याच कालावधीत त्यांनी शिक्षण सुरू केले. त्यांनी ८२व्या वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. २०१७ मध्ये त्यांनी इतर पेपर उत्तीर्ण केले होते.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निम्रत कौर यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी चौटाला यांचे अभिनंदन केले. अभिषेक बच्चन यांनी नुकतेच दसवी या चित्रपटात एका जाट समुदायाच्या नेत्याची भूमिका साकारली होती. तुरुंगात असताना हा नेता दहावीची परीक्षा उत्तीर्ण होतो, असे चित्रपटाचे कथानक असून ते चौटाला यांच्या कथेशी मिळते जुळते आहे.

Abhishek Bachchan’s ‘Dasvi’ Inspiration, the 87-year-old former Chief Minister passed 12th with 10th!

 

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात