विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raosaheb Danve माध्यमांनी यापूर्वीही छत्तीसपड आणि राजस्थानात भाजपची पीछेहाट होईल असे म्हटले होते, मात्र त्यावेळी तसे होणार नाही, असे मी म्हणालो होतो. तसेच हरियाणाबाबतही माध्यमांमध्ये एक्झिट पोलमध्ये भाजपची पीछेहाट दाखवत होते. मात्र, तसे घडले नाही. पंतप्रधान मोदींना मानणार एक वर्ग भाजपच्या मागे आहे. तो सभेत किंवा रस्त्यावर दिसत नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी हरियाणातील निकालावर दिली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील निकाल आम्हाला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. Raosaheb Danve
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. हरियाणात मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर होती. मात्र काही वेळाने भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले. हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र येत असलेल्या निकालावरून दिसत आहे. यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. रावसाहेब दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रातही हरियाणासारखीच परिस्थिती होईल, असे म्हटले आहे.
मोदींना मानणारा एक वर्ग भाजपच्या मागे उभा
रावसाहेब दानवे म्हणाले, यापूर्वी वृत्तवाहिन्यांनी छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपचे पीछेहाट दिसेल, असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी देखील मी म्हटले होते की, तसे होणार नाही. तसेच हरियाणाबाबत देखील वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला पीछेहाट दाखवत होते. मात्र तसे घडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा एक वर्ग आहे. हा वर्ग सभेत आणि रस्त्यावर दिसत नाही. मात्र, त्यांच्या प्रपंचात पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जी सरकारी मदत होते, त्यामुळे हा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मागे उभा राहतो, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील कौल आम्हाला मान्य
रावसाहेब दानवे यांनी जम्मू-काश्मीरमधील निकालावर देखील प्रतिक्रिया दिली. जम्मू-काश्मीरमधील कौल आम्हाला मान्य आहे. भाजप केवळ निवडणुकीसाठी राजकारण करत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्यांना आणि सर्वांना सारखा न्याय मिळावा, यासाठी भाजप काम करत असते. काश्मीरमधील निकालात पिछेहाट दिसत असली तरी आमची तेवढी पिछेहाट झालेली नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App