बारामती मतदानाच्या दिवशी शिवीगाळ आणि तूच हातात वस्तरा घेऊन मिशी काढ!!, तरी मतदानाच्या टक्क्यात नाही वाढ!!

विशेष प्रतिनिधी

बारामती : एकीकडे बारामतीत मतदानाचा टक्का घसरलाय, पण दुसरीकडे पवार विरुद्ध पवार हे भांडण काही थांबायला तयार नाही. एरवी बारामतीत सकाळपासूनच मतदानाला वेग येतो पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत बारामतीत सर्वात कमी म्हणजे फक्त 14 % मतदान झाले होते. On the day of Baramati polls, abuse and shave your mustache with a razor in your hand

एवढे असून पवार विरुद्ध पवार या भांडणात कमी येण्याऐवजी ते वाढले इंदापुरात दत्ता मामा भरणे यांनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी व्हायरल केला अजित दादा गटाने पैसे वाटले त्यासाठी पीडीसीसी बँक रात्री एक वाजेपर्यंत उघडी होती बँकेतले कर्मचारी पैसे वाटप सहभागी झाले असा आरोप रोहित पवारांनी केला दत्ता मामा भरणे यांच्या शिवीगाळी विरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली.

पण त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी जाऊन आशा काकींना नमस्कार केला. अजित पवारांची त्यांनी भेट घेतली नाही.

मेरे साथ माँ है असे म्हणत अजित पवारांनी आशाताईंबरोबर जाऊनच मतदान केले त्याचवेळी त्यांनी तूच तुझ्या हातात वस्तरा घेऊन माझी मिशी काढ असा टोमणा श्रीनिवास पवारांना हाणला.

पण या सगळ्यात बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला याचा अर्थ पवार विरुद्ध पवार या भांडणात बारामतीकरांना काहीही इंटरेस्ट नाही हे सिद्ध झाले अजित पवारांच्या बंडाने बारामतीकर ना सुखावले, ना दुखावले…!! अजित पवारांनी बंड केले म्हणून बारामतीकरांनी पुढे येऊन ना मतदान केले ना शरद पवारांचे राजकारण आता बस्स झाले असे म्हणून बारामतीकरांनी ना अजितदादांना मतदान केले…!! पवार घरातल्या भांडणात बारामतीकरांनी सुरवातीला तरी मतदानाचा टक्का कमी करून प्रतिसाद दिला

On the day of Baramati polls, abuse and shave your mustache with a razor in your hand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात