नगर जिल्ह्यात ‘ नो व्हॉक्‍सिन नो एंट्री’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

नगर -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० ते ७० अशी आढळून आली.’No Vaccine No Entry’ in Nagar District; Order issued by the Collector


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान नगर -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० ते ७० अशी आढळून आली.यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालये व दुकानामध्ये जाण्यासाठी नो व्हॉक्‍सिन नो एंट्री असा आदेश काढला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क सॅनिटाझर अनिवार्य केले आहे.

या ठिकाणी नो व्हॉक्‍सिन नो एंट्री

सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना-कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी कोविड डोसच्या प्रमाणपत्राशिवाय आता प्रवेश मिळणार नाही.



जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नेमके काय सांगितले

१)प्रत्येकांची किमान प्रतिबंधात्मक लसीकरणाचा एक डोस घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहणार आहे.
२) निमयांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

‘No Vaccine No Entry’ in Nagar District; Order issued by the Collector

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात