अहमदनगर : मनपा पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी विजयी, अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या तिवारींचा पराभव


येथील अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापालिका पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश तिवारींचा पराभव केला. Ahmednagar BJP’s Pradip Pardeshi wins Municipal Corporation by-election


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : येथील अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापालिका पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश तिवारींचा पराभव केला.

भाजपच्या प्रदीप परदेशी यांना एकूण ३१०६ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांना दुसऱ्या क्रमांकाची २५८९ मिळाली. अशा प्रकारे परदेशी यांनी त्यांचा 517 मतांनी पराभव केला.मतमोजणीदरम्यान सुरुवातीला आघाडी घेतलेले मनसेचे पोपट पाथरे (१७५१) तिसऱ्या स्थानी ढकलले गेले. ही मनपा पोटनिवडणूक शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे पद रद्द झाल्याने झाली होती. या विजयाबद्दल भाजपचे प्रदीप परदेशी यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

Ahmednagar BJP’s Pradip Pardeshi wins Municipal Corporation by-election

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण