नितीन गडकरींची कडक भूमिका; काँग्रेसवर केली जोरदार टीका
विशेष प्रतिनिधी
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम महिलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. नागपूरच्या ताजबागमधील गुंडगिरी हटवा, असे ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेच्यामध्ये जो कोणी येईल त्याला ठोका, असे असे नितीन गडकरी म्हणाले.
रस्त्यावर खड्डे पडले तर तुमच्या अंगातही खड्डे पडेन आणि तुमची चांगलीच धुलाई करीन, असे मी ठग ठेकेदारांना स्पष्टपणे सांगितले आहे. आता भीतीपोटी सर्व कामे नीट केली जात आहेत. असंही गडकरींनी सांगितलं
काँग्रेसबाबत गडकरींनी विचारले, काँग्रेसने 60 वर्षांत काय केले? जनतेला काहीच मिळाले नाही. ते जातीवादी राजकारण करतात आणि लोकांच्या मनात विष कालवतात. काँग्रेसने नेहमीच संविधानाचा अवमान केला आहे. आम्ही कोणतेही संविधान बदललेले नाही. भाजप सत्तेत आल्यास तुम्हाला मारून टाकेल, असं काँग्रेसने मुस्लिमांना सांगितले आहे. तुम्ही सांगा आम्ही किती मुस्लिमांच्या हाताचे ऑपरेशन केले. आम्ही किती मुस्लिमांना पाय दिला आहे? तुमची जात काय हे आम्ही कधीच विचारले नाही. आम्ही ताजबागचे सुशोभीकरण केले आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, आमच्याकडे जे काही गरीब आले, आम्ही त्यांची सेवा केली. आम्ही कधीही जातीचे राजकारण केले नाही. तथापि, काही लोक असेच करतात. ते लोकांच्या मनात विष कालवतात. बाबासाहेब संविधान बदलणार असल्याचे सांगून खोटे राजकारण करतात. आम्ही राज्यघटना बदलली नाही आणि राज्यघटना बदलणार नाही. काँग्रेसने संविधानाचे तुकडे केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App