नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी; स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घेण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासणार!!


देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात नितीन देसाई यांच्या पश्चात चर्चा झाली. यावेळी राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. नितीन देसाई यांच्या मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात संशय आहे. त्यांच्यावर कर्ज होते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.Nitin Desai’s death; The studio will check the legal issues before taking over the government!!

या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा खुलासा केला. संबंधित स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्याच्या कायदेशीर बाबी तपासून मग निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर कोणी दबाव आणत होते का?? ज्यादा व्याज लावले होते का??, या बाबींची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केलीभाजपा आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी आज सभागृहात नितीन देसाई यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्टुडिओचा लिलाव करु नका, काँग्रेस आमदाराची मागणी

“नितीन देसाई यांनी मराठी चित्रपटात वेगळी छाप उमटवली. चांगला स्टुडिओ उभारला. चांगलं काम नितीनजी यांनी केलं. जे पाहतोय, ऐकतोय ऑडिओ क्लिपमधून त्यांनी पुरावे दिले आहेत. कर्ज वसुलीसाठी लोक जाचक पद्धतीने त्यांच्या मागे लागले होते का? असं इम्प्रेशन तयार झालय. आशिष शेलार यांनी मागणी केल्याप्रमाणे सखोल चौकशी झाली पाहिजे. लिलाव न करता शासनाने हा स्टुड़िओ ताब्यात घ्यावा, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल” असं अशोक चव्हाण म्हणाले.

वाराणसीचे घाट सुंदर बनवण्यात

नितीन देसाई यांचे योगदान

नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाच नाव होतं. कला दिग्दर्शनात त्यांनी आपलं बस्तान बसवलं. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलं. केवळ हिंदी चित्रपटच नाही, अनेक राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, त्या कार्यक्रमात कुठली थीम असली पाहिजे, यासाठी त्यांना बोलावल जायचं, ते थीम सुद्धा तयार करुन द्यायचे. दिल्लीमधील चित्ररथ आपण त्यांच्याच माध्यमातून तयार करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील घाट सुंदर बनवले, त्यामध्ये त्यांच योगदान आहे. एका अतिशय हरहुन्नरी कलावंत, कलादिग्दर्शकाचा मृत्यू अतिशय दुर्देवी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सखोल चौकशी होणार

ही गोष्ट खरी आहे, त्यांच्यावर कर्ज होते. स्टुडिओ गहाण ठेवला होता. निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. स्टुडिओ सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. कुठे जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी दबाव आणला होता का?? नियमाच्या बाहेर जाऊन व्याज लावून अडकवण्याचा प्रयत्न झाला का??, याची सखोल चौकशी सरकार करेल” असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

सरकार स्टुडिओ ताब्यात घेणार का?

नितीन देसाई यांची आठवण म्हणून एनडी स्टुडिओच कसे संवर्धन करता येईल??, तो ताब्यात घेता येईल का??, या विषयी कायदेशीर बाबी तपासल्या जातील. आत्ताच त्या बद्दल घोषणा करता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Nitin Desai’s death; The studio will check the legal issues before taking over the government!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात