महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं, असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध निसर्गकवी प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्या किडनी विकारावर उपचार सुरु होते. दरम्यान आज सकाळी ८ वाजून ३९ मिनटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार. ना. धो. महानोरांच्या निधानावर सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. MNS President Raj Thackeray expressed grief over the death of N D Mahanor
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीटद्वारे शोक व्यक्त केला आहे. ‘’ना.धो. महानोर ह्यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ह्यांच्या कवितेचा वारसा ना.धो. नी समृद्ध केला. ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.’’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
याशिवाय ‘’नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.’’असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
याचबरोबर ’’२०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती. ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.’’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी ना.धो.महानोरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App