विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोस्टर वरचे मुख्यमंत्री खाली आले, विधानसभा अध्यक्षांनी स्टिकर काढल्यावर अजितदादा खुर्चीवर बसले!!, असे आज मुंबईतल्या कार्यक्रमात घडले.The Chief Minister on the poster came down; After removing the sticker, Ajit Dada sat on the chair!!
मुंबईत आमदारांच्या मनोरा निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणे अपेक्षित होते. परंतु एकनाथ शिंदे यांना अंगात कणकण जाणवत असल्याने ते आयत्या वेळेला कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. पण कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांच्या नावाची खुर्ची होती.
एकनाथ शिंदे कार्यक्रमाला येणार नाहीत हे म्हटल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर येऊन बसण्याचे आवाहन केले पण त्यावेळी अजितदादा काहीसे बिचकले. मग स्वतः राहुल नार्वेकरांनीच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरचा स्टिकर काढून टाकला आणि त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चेला हवा मिळाली. अर्थात अशा चर्चेला हवा देण्याचे काही कारण नाही. त्यात विशेष काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त करून त्या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
अजितदादांचे समर्थक त्यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर लावून आपले समाधान करून घेत असतात. मराठी माध्यमेही त्या चर्चेला हवा देतात. पण अजितदादा सध्या मुख्यमंत्री होणार नाहीत ही वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केल्यामुळे मराठी माध्यमांच्या बातम्या बात का बतंगड ठरतात हेच यातून दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App