Narayangaon accident नारायणगावजवळ भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू

Narayangaon accident

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका मोटारीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला जाऊन धडकला, आणि त्यामुळे मॅक्झिमो ही गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एस टी बसला जाऊन धडकली.

आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला. त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले त्यातील सहा प्रवासी जागी मृत झाले. चार गंभीर जखमी वर नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Nine people died in a terrible accident near Narayangaon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात