विशेष प्रतिनिधी
मुंबई : New government महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रूपाने त्यांना उपमुख्यमंत्री देखील मिळाले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांच्या समावेश होण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिले.New government
एकीकडे महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होत असताना, त्या सरकारशी लढताना मात्र विरोधक जुनीच राजकीय हत्यारे परजत असल्याचे स्पष्ट होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवे सरकार चालविताना जुन्या मुद्द्यांसह काही नव्या मुद्द्यांचा समावेश करू, असे सूतोवाच केले. जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त पाळण्याची तारेवरची कसरत देखील करायचे आव्हान पेलू, असे आश्वस्त केले.
निवडणुकीच्या काळात मराठा आरक्षणासह विरोधकांनी उचलून धरलेले मुद्दे भाजपने आणि महायुतीने तेव्हा व्यवस्थित हाताळले. पण आता देखील अधिक कौशल्याने हाताळण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली.
हे सगळे होत असताना विरोधक मात्र जुन्याच राजकीय हत्यारांनी नव्या सरकारशी लढू पाहत असल्याचे उघड दिसू लागले आहे. राहुल गांधी म्हणे आपली EVM विरोधातली यात्रा सोलापूर जिल्ह्यातल्या मारकड पासून सुरु करणार आहेत. ज्या मारकड गावात शासकीय यंत्रणेला पर्यायी यंत्रणा उभी करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे आंदोलन झाले, त्या गावातून EVM विरोधातली यात्रा सुरू करण्याचे “राजकीय औचित्य” म्हणे, राहुल गांधी दाखवणार असल्याचे तिथले EVM वरच निवडून आलेले आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.
मूळात EVM चा मुद्दा नवा नाही. तो EVM वर पहिल्यांदा निवडणुकीत मतदान झाले, त्या निवडणुकीपासून आत्ताच्या निवडणुकीपर्यंत वादग्रस्त राहिला आणि इथून पुढे देखील त्या मुद्द्यावर वाद मिटण्याची शक्यता नाही, तरी देखील राहुल गांधींनी हातात दुसरा मुद्दाच नसल्यामुळे ईव्हीएम विरोधातली यात्रा मारकड पासून सुरू करण्यात असल्याचा इरादा व्यक्त केला.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी, शपथ घेताना आणि शपथ घेतल्यानंतर मनोज जरांगेंची भाषा बदललेली नाही. त्यांनी जुनी तशीच दमबाजी चालू ठेवली आहे. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रातल्या जनतेने मतदानाद्वारे नाकारला, पण तोच मुद्दा रेटून पुढे नेत सरकारला वाकविण्याचा इरादा मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे यांच्याकडे देखील जुनेच उपोषणाचे हत्यार आहे. ते अंतरवली सराटी आणि कदाचित मुंबई पुन्हा उगारले जाण्याची शक्यता आहे.
बाकीचे विरोधक तर सध्या गप्पच बसलेत. त्यांना विधानसभेत बसायला विरोधी बाक मिळतील, पण कुणाला विरोधी पक्षनेते पद तरी मिळू शकेल का??, याची चिंता आहे. कारण तेवढे संख्याबळच विरोधकांकडे नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App