महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काल पार पडला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray महायुती सरकारचा काल शपथविधी सोहळा पंतप्रधा नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांसह, अन्य केंद्रीयमंत्री तसेच राजकारण, उद्योग, बॉलिवूड, क्रीडा अन् सामाजिक जगतामधील दिग्गाजांनी हजेरी लावली होती.Raj Thackeray
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीसांचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे खास अभिनंदन केले.
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.’
तसेच ‘पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की… मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा ! राज ठाकरे.’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App